बुधवार, ८ जानेवारी, २०२५

निराशा : कारणे व उपाय


आजच्या काळात सगळंच इन्स्टंट झालं आहे... सगळ्यांना सगळंच इन्स्टंट हवं असतं... इन्स्टंट सुख, इन्स्टंट दुःख की जे लगेच कमी व्हावं असं वाटतं, इन्स्टंट प्रेम, इन्स्टंट दुरावा, इन्स्टंट पैसा, इन्स्टंट यश... संयम कोणालाच नको आहे, वाट पहायला कोणीच तयार नाही आणि वारंवार प्रयत्न करून हवं ते मिळवण्यासाठी कष्ट घ्यायला तर त्याहून कोणी तयार नाही. आणि मग या सगळ्या इन्स्टंट गोष्टींमुळे इन्स्टंट निराशा पदरी पडते ज्याला हल्ली नैराश्य असे म्हणतात. याचीच माहिती आता आपण पाहूया माझ्या ब्लॉग मधे. नक्की वाचा आणि तुमच्या प्रतिक्रिया माझ्यापर्यंत पोचवा.

निराशा : कारणे उपाय

निराशा(नैराश्य) म्हणजे मनाची उदासीन अवस्था.

निराशेचे प्रकार

)  शारीरिक नैराश्य
)  मानसिक नैराश्य
)  सामाजिक नैराश्य

यातील कुठलेही नैराश्य हे सौम्य किंवा तीव्र स्वरूपाचे असू शकते.
जगातील २० ते ३० टक्के व्यक्तींना कधीतरी हा आजार होत असतो. पौगंडावस्थेनंतर पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये हा आजार होण्याचे प्रमाण दुप्पट आहे. नैराश्य काही दिवसांचे असते किंवा काही वर्षांचे देखील असू शकते.

नैराश्याची लक्षणे

यामध्ये व्यक्तीला सतत उदास वाटते आणि कुठल्याही कामात मन लागत नाही किंवा रस वाटत नाही.
काहीच करावेसे वाटत नाही उदाहरणार्थ अगदी सकाळी उठणे, दैनंदिन कामे करणे, खाणे पिणे काहीही करावेसे वाटत नाही.
) काही लोक सतत कंटाळवाण्या अवस्थेमध्ये पांघरुणात पडून दिवस काढतात.
)  आला दिवस ढकलणे एव्हढेच ध्येय या निराशा आलेल्या लोकांचे असते.
)  कितीही उत्साही वातावरण असले तरी या लोकांचे मन रमत नाही.
)  या लोकांचा एकटेपणा वाढतो.आत्महत्येचे विचार मनात येतात.
)  सतत चिडचिड आणि चिंता करणे हेच यांचे मुख्य काम आहे असे यांना वाटू लागते.
)  भूक लागणे हे देखील एक लक्षण आहे.
)  या लोकांना झोप लागत नाही  किंवा अस्वस्थ झोप लागते.
१०जगाबद्दलचे नकारात्मक विचार येतात.

ही सर्व लक्षणे सौम्य किंवा तीव्र प्रकारची असू शकतात.
 
निराशा किंवा नैराश्याची 
कारणे

जीवनातील प्रतिकूल घटनांमुळे निराशा येऊ शकते. सतत मनाविरुद्ध घटना घडत असतील तरी देखील नैराश्य येऊ शकते.
स्वतःबद्दल किंवा जगाबद्दल सतत नकारात्मक विचार करत असतील तर निराशा येऊ शकते.
नोरेपीनेफ्रीन आणि सेरोटोनिनमेंदूतील या रसायनांची मात्रा जर कमी झाली तर मनःस्थिती उदासीन होऊ शकते.
प्रसूतीनंतरचे नैराश्य शक्यतो बाळंतपणानंतरच्या काळात स्त्रियांमध्ये प्रसुतिनंतर उदासीनता विकसित होते.
एखादा अपघात झाल्यानंतरही नैराश्य येऊ शकते.
एखादा मानसिक आघात झाल्यावर देखील निराशा येऊ शकते.
बालपणातील काही घटनांमुळे निराशा येऊ शकते.
काही लोकांना नैराश्य हे अनुवांशिक देखील असू शकते पण त्याची शक्यता कमी असते.
)  सतत असुरक्षित वातावरण असेल तरी देखील नैराश्य येऊ शकते.
१०प्रिय व्यक्ती किंवा वस्तूचे तीव्र प्रमाणात नुकसान झाले असेल तरी देखील नैराश्य येऊ शकते.
११शिक्षण आणि करियर यासाठी दबाव येत असेल तरी देखील नैराश्य येऊ शकते.
१२कौटुंबिक समस्या घरातील असुरक्षीत वातावरण असेल तरी देखील नैराश्य येऊ शकते.
१३नातेसंबंधांमध्ये तणाव 
असेल तरी देखील नैराश्य येऊ शकते.
१४) जवळच्या लोकांच्या अपेक्षा पूर्ण करता आल्या नाही तरीदेखील निराशा येते.
१५) एखाद्या गोष्टीची सतत इतरांसोबत तुलना केली आणि त्यात स्वतःची बाजू कमीपणाची आहे असे सतत वाटणे हेही निराशेचे कारण असू शकते.
१६नियमितपणे केल्या जाणार्‍या उत्तेजक किंवा मादक द्रव्यांच्या सेवनामुळे डिप्रेशन येऊ शकते.
१७काही औषधांचा दुष्परिणाम म्हणून देखील नैराश्य येऊ शकते.
 
नैराश्याचे उपाय

मानसिक आरोग्यासाठी संतुलित आहार अतिशय महत्वाचा आहे.
दैनंदिन कामे योग्य वेळी करणे हाही एक उपाय आहे म्हणजे सकाळी लवकर उठून अंघोळ करणे आणि नाश्ता वेळेवर करणे तसेच बाहेरील आणि घरातील कामे वेळच्या वेळी करणे यामुळे शरीराला  एक प्रकारची शिस्त लागते आणि मन वेगवेगळ्या गोष्टींमध्ये गुंतू लागते यामुळे आपसूकच निराशेची भावना कमी होते.
जवळच्या व्यक्तीसोबत आपल्या काही महत्वाच्या गोष्टी किंवा मनातील खंत बोलून दाखवल्याने देखील निराशा कमी होते.
) निसर्गात फिरल्याने किंवा बागकाम केल्याने मन प्रसन्न होते आणि मेंदूला योग्य रक्तपुरवठा होतो नैराश्य कमी होते.
रोज सकाळी नित्यनियमाने शारीरिक व्यायाम केल्याने देखील नैराश्य येत नाही.
) रोज सकाळी तसेच रात्री झोपताना ध्यानधारणा केल्याने मन संतुलित राहते.
काही विशिष्ट प्रकारची संगीत ऐकण्याने देखील मन प्रसन्न होते निराशा दूर होते.
चित्र काढणे रंग भरणे यामुळे देखील काही लोकांचे मन प्रसन्न होते.
) गरजू लोकांना मदत करणे,छोट्या मुलांसोबत खेळणे तसेच वृद्ध लोकांची सेवा करणे यामुळे देखील निराशा दूर होते.
१०) वेगवेगळ्या ठिकाणी प्रवास करणे तसेच नवनवीन लोकांना भेटणे , चित्रपट बघणे यामुळे देखील रोजच्या दिनचर्येत बदल होतो आणि तीच तीच कामे करून आलेली मरगळ दूर होते.
११) योग्य प्रमाणात आणि शांत झोप हे सर्वात महत्वाचे आणि असरदार औषध आहे.
१२निराशा जास्त प्रमाणात असेल तर डॉक्टरची देखील मदत घेऊ शकतात.
१३) पाळीव प्राण्यांसोबत खेळण्याने देखील नैराश्य कमी होऊ शकते.
१४समुपदेशकाचा सल्ला देखील यामध्ये उपयोगी पडू शकतो.

या सर्व उपायांचा लवकरात लवकर अवलंब केल्याने निराशा जीवनातून कायमची निघून जाईल आणि मन सकारात्मक ऊर्जेने भरेल.


"मन करा रे प्रसन्न,
सर्व सिद्धींचे
साधन"

सुचेता जोशी गोसावी 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बी एफ एफ – १

  बी एफ एफ – १   खरं तर माझ्या दोन्ही आज्जी म्हणजे आईची आई आणि वडिलांची आई अशा दोघीही माझ्या बेस्ट फ्रेंड्स होत्या . हो ...